Special Issue Description


Authors : कु.सुलभा गुलाबराव वानखेडेे

Page Nos : 425-428

Description :
धान पिकांच्या उत्पादनासंबंधी यासंबंधी जगातील सर्वात प्राचीन पुरावे अभ्यासता असे दिसून आले की, पूर्व सुमारे 1000 ते 800 च्या दरम्यान हासीनापुरातील उत्खननात सुद्धा कार्बनाभुत झालेले भाताचे दाणे आणि सोबत टरफले आढळून आली आहेत. इत्यादीस. पूर्व 2300 मध्ये करण्यात आले होते. याच बरोबर प्राचीन भारताच्या वैदिक वाड्यमयात देखील यज्ञकंुडसत आहुती प्रदान करण्यासाठी तांदुळाचा उपयोग केला जात असे असा पुराणात उल्लेख आहे.आग्नेय आषियात धानाचे उत्पादन घेतले जात होते. इत्यादीस. पूर्व 3500 च्या प्रारंभी थायलंड येथील या उत्खननात त्या काळात वापरल्या जाणार्‍या मातीच्या भांड्यााच्या तुकड्याावर धानाच्या टरफलाचे अंश व ठसेे सापडले आहेत. भारतातील सिंधु नदीच्या खोर्‍यातील मोहेंजोदडो आणि हडप्पा येथील संस्कृतीच्या उत्खननात गुजरात राज्यातील लोथ येथे धानाच्या टरफलांचे अवशेष व धानाच्या दाण्यांचे चिखलावरील ठसे आढळून आले आहेत. हे उत्खनन धान पिकाच्या उत्पत्तीबाबत प्राचीन इतिहास व प्राचीन ग्रंथामध्ये वरील प्रमाणे उल्लेख आहे. तसेच उत्खननात आढळून आलेले पुरावे उपलब्ध आहेत. या सर्व पुराव्यांचा एकत्रित विचार व चिंतन केल्यास असे लक्षात येते की, भारतामध्ये धान पिकाची लागवड फार पुरातन काळापासून करण्यात येत आहे. भारतातील दक्षिणेकडील प्रदेशात केलेल्या उत्खननात व त्यात आढळून आलेल्या पुराव्यावरुन भारतात दक्षिणेकडील धान पिकाचे उगमस्थान आहे असा निष्‍कर्श निघतो.

Date of Online: 30 March 2022