Authors : श्वेता गुंडावार व डॉ. उषा खंडाळे
Page Nos : 421-423
Description :
नोटबंदीनंतर डिजिटल व्यवहाराला चालना मिळेल असे सरकारला वाटत होते ती चालना नोटबंदीच्या चार वर्षानंतर मिळायला सुरवात झाली, कोरोनाचे संकट आले व शक्य तितका लोकांशी संपर्क टाळण्याची आवश्यकता निर्माण झाली व त्यासाठीच बर्याच लोकांनी दररोज लागणार्या वस्तूंचे पेमेंट डिजिटल व्यवहारातून करण्यास सुरुवात केली. या डिजिटल व्यवहारासाठी प्लास्टिक मनी कार्ड जसे, क्रेडिट, डेबिट, एटीएम कार्ड याशिवाय वेगवेगळ्या बँकांचे युपीआय, पेटीएम, गुगल पे, फोन पे यासारख्या डिजिटल माध्यमांचा वापर महिलांकडूनही काही प्रमाणात केल्या जात आहे. महिलांमध्ये प्लास्टिक मनी कार्डच्या वापराविषयीची भीती कमी करून प्लास्टिक कार्ड विषयीची जागरुकता वाढविल्यास प्लास्टिक कार्डच्या वापरात महिला पुढे येतील व सरकारच्या डिजिटल व्यवहाराच्या योजनेला गती मिळेल.