Authors : राजेंद्र आनंदराव मालेकर
Page Nos : 403-405
Description :
आजचे युग हे डिजिटल मार्केटिंगचे यूग म्हणून ओळखले जाते कारण आज सर्व प्रकारच्या वस्तु ऑनलाईन वेगवेगळया माध्यमाच्या सहायाने खरेद विक्री करता येतात. मग त्या कोणत्याही प्रकारच्या वस्तु व सेवा असो त्याला सोयीस्कर अशा माध्यमाचा वापर करून आपल्या घरापर्यंत आणता येतात. तसेच वस्तु कशा पध्दतीच्या आहे कोणत्या उपयोगाच्या आहे. त्या वस्तु पासुन काय फायदे आहे. तीचा कसा वापर करावा या सर्व प्रकारची माहिती आज आपणास घरबसल्या मोाबईल किंवा संगणकावर घरी उपलब्ध होतात. हे शक्य झाले आहे फक्त या डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातूनच. या डिजिटल माकेंटचा वापर विविध कामासाठी वेगवेगळया विभागात वेगवेगळया ठिकाणी करण्यात सोपे झाले आहे. त्यामुळे वेळ, पैसा व श्रमाची मोठया प्रमाणात बचत होते. या मार्केंटिंगच्या माध्यमातुन ग्राहकांना त्या वस्तुचा सकारात्मक व नकारात्मक प्रक्रीया जाणुन घेता येतात. आणि लोकांकडून थेट संपर्क ठेवून त्याचा योग्य प्रतिसात मिळविता येतो. आणि आपल्या वस्तुची लोकप्रियता मिळविता येते. अशा प्रकारे व्यवसाय करण्यास मदत होते.