Authors : प्रा. डाॅ. निलकंठ ठावरी
Page Nos : 399-402
Description :
भारताने 1991 मध्ये जागतिकीकरण स्विकारले. 1990 ला भरतावर मोठे संकट ओढवले. त्यावेळेस भारताजवळ विदेशी गंगाजळीचा साठा संपुष्टात आला होता. आंतराष्ट्रिय स्तरावर अमेरीका व इतर पाश्चात्य राष्ट्रांचे प्राबल्य होते. त्यामुळे भारताला अमेरीकेच्या दबावाखाली येवून नविन आर्थिक धोरण स्विकारावे लागले. भारतासाठी 2020-21 हे वर्ष कोरोनाच्या प्रादृभावामुळे अत्यंत त्रासाचे व कष्टाचे व आथिक विकासावर अत्यंत प्रतिकूल परिणाम करणारे ठरले. देशातील कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक, राजकिय, आर्थिक व आरोग्यविषक संकटाचे विकासावर प्रतिकूल परिणाम होतात. कोव्हिड-19 चा प्रसार नियंत्रीत करण्यासाठी वेगवेगळया देशातील सरकारने स्विकारलेल्या टाळेबंदीचे अत्यंत प्रतिकूल परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाले.
केरोना प्रतिबंधीत करण्यासाठी लोकांचा एकमेकांशी संपर्क होवू नये म्हणून लाॅकडाउन, भौतिक दुरता व तोंडाला मास्क लावणे, वारंवार साबनाने हात धुने असे सोपे व सरळ उपाय योजण्यात आले. परंतू लाॅकडाउ भारताने अतिशय कठोरपणे व प्रामाणिकपणे लागू केला. त्यामुळे संपूर्ण क्षेत्र, समाज जेथे होता तेथे बदिस्त झाला लाॅकडाउनमध्ये सर्वाचे व्यवहार जैसे थे राहले त्यामुळे सहदारी बंद, कारखाने बंद, यातायात बंद, बाजारपेठ बंद, सर्वव्यवहार बंद, कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्र, शेती क्षेत्र आरोग्य क्षेत्र, उद्योग क्षेत्र, असंघटीत क्षेत्राला तडाखा, पर्यावरणपूरक टाळेबंदी अशाप्रकारचे परिणाम झाले.
सद्यस्थितीत भारतात कोरोनाचा प्रभाव थोडा फार कमीझाल्यामुळे सरकारने उद्योग, सेवा व दळणवळण हे क्षेत्र सुरू केले व त्यामुळे देशाचा आर्थिक विकास दर सुधारत आहे. कोवीड-19 वर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरणाला सुरूवात झाली आहे. आरोग्य, शिक्षण पायाभूत सेवा आणि सुविधा मोठया प्रमाणावर वाढविण्याबरोबरच खाजगी क्षेत्राचे नियमन करणे आवश्यक आहे.