Authors : डाॅ. जे.एस. मोहितकर
Page Nos : 381-388
Description :
भारतीय अर्थव्यवस्थेतील असंघटीत क्षेत्रात काम करणारी लोकसंख्या मोठया प्रमाणावर आहे. अशाच क्षे़त्रातील महिला शेतमजुर ही सुध्दा एक महत्वाचा घटक आहे. त्याच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा अभ्यास या शाेधनिबंधात घेतला आहे. शेतमजूर महिलांचे कामांचे दर पुरुष मजुरापेक्षा कमी आहे. समान काम करित असतानासुध्दा हे दर कमी दिसुन येतात. शिक्षणाचा प्रसार झाला असतांना त्यांच्या शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. हे सर्व जाणुन घेण्याचा प्रयत्न या शाेधनिबंधात आहे. यात महिला शेतमजुराच्या कामाची विभागणी, त्यांच्या वयोगट, अल्प मजुरी दर, कर्जबाजारीपणा, ग्रामीण उद्योगधंद्याचा र्हास, बेकारी व अर्धबेकारी, त्यांचे बचतीचे प्रमाण, शैक्षणिक स्थिती, आरोग्य, व्यसनाधिनता, त्यांच्यातील संघटनेचा अभाव इत्यादी घटकांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. यात शासनाच्या उपाययोजना उदा. राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, ई-श्रमिक कार्ड यांचे स्वरुप व माहिती तसेच अभ्यासावरुन संशेाधनात आलेले निष्कर्ष व शिफारसी मांडण्यात आल्या आहे. एकंदरीत शेतमजुर महिलांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थतीचा अभ्यास करण्याचा उद्येशाने या विषयाची निवड केली आहे.