Authors : डाॅ. सौ. प्रभा चिंचखेडे
Page Nos : 377-380
Description :
जगामध्ये कोणत्याही प्रकारची महामारी किंवा संकट येते तेव्हा सर्वसामान्यांवर देखील त्याचे दुष्परिणाम होतात किंवा असेही म्हणता येईल की सर्वसामान्यांवर आणि देशाच्या आर्थिक अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रभाव होत असतो. अशाच प्रकाराची एका महामारीने सध्या संपूर्ण जगभरात थैमान घातलेले आहे. ती म्हणजे कोविड 19 किंवा कोराना होय. या रोगाचा संसर्ग फारच लवकर होतो. त्याचे शरिरावर व मनावर अनेक विपरीत परिणाम होतांना दिसून येतात. या आजाराने देषभरात असे थैमान घातले की, सरकारला काही कठोर पावलेही उचलावी लागलीत. जसे लाॅकडाऊन. या लाॅकडाऊन चा परिणाम सामान्य जनतेवर तर झालाच पण त्याच बरोबर रोजगारावर देखील झालेला दिसून येतो. ब-याच लोकांना नोकरीला मुकावे लागले तर बरेच लोक बेरोजगार झाले. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर देखील झालेला दिसून येतो.