Authors : डाॅ. प्रज्ञा एस. जुनघरे
Page Nos : 370-373
Description :
देशाच्या आर्थिक, सामाजिक, सास्कृतिक स्तर उंचावण्याच्या दृष्ट्रीकोणातून महिलांचे सक्षमिकरण होणे अतिशय आवश्यक आहे. तसेच महिलांना रोजगार विषयक योजणांची माहीती असणे सुध्दा महत्वाचे आहे. जेणेकरून महिला सामुहीकपणे व सर्वांगीण उन्नतीच्या समान विचाराणे क्रियाशील राहातील. महिलांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी त्यांना शिक्षण घेणे आवश्यक आहे. शिक्षणामुळे महिला स्वयंरोजगार तसेच सरकारच्या योजना समजू शकतात. स्वयंरोजगारामुळे आर्थिक सक्षमीकरण होते. एकंदरीत महिलांचे अधिकारपूर्ती व सक्षमीकरणासाठी शाश्वत आर्थिक, सामाजिक व राजकीय अधिकार उपलब्ध करूण देणे आवश्यक आहे.
शासकीय योजनांद्वारे महिलांचा विकास तर घडून येतोच शिवाय राष्ट्राची प्रगती सुध्दा घडून येते. आजच्या खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाच्या युगात व्यापार, उद्योग व स्वयंरोजगारामुळे महिलांच्या सक्षमीकरणाला योग्य हातभार लागत आहे. विषेश म्हणजे यासाठी केंद्र, राज्य व सहकारी बॅंका वित्त पुरवठाकरून महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया जल गतीने पार पाडत आहेत. आज आर्थिक बाबींचा विचार केल्यास खर्या अर्थाने योजनांची गरज आहे असे वाटते. जेव्हा या योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात येईल तेव्हाच स्त्री आर्थिक बाबतीत सक्षम होईल, तिच्या गरजा पूर्ण होऊन राहणीमानाचा दर्जा, विचारधारणा यात अपेक्षीत बदल घडून येईल.