Authors : श्री. संतोष ए. कावरे
Page Nos : 323-325
Description :
प्रस्तुत विषयाच्या संदर्भात आजच्या युगामध्ये समाज रथाची दोन चाके म्हणून स्त्री आणि पुरूष यांच्याकडे बघितले जाते. देशाच्या विकासामध्ये सुध्दा या दोन घटकांचे योगदान महत्वाचे असल्याचे दिसून येते. तरीही आज स्त्रियाबद्दल विचार केला असता आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांचे स्थान कमी असल्याचे आढळते. कारण सुरवातीलाच स्त्रियांचे कार्यक्षेत्र फक्त चुल आणि मुल एवढेच आहे असे ठरविण्यात आले पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये त्यांचे स्थान कुठेतरी हरवल्यासारखे दिसुन आले पण भारतामध्ये घडुन आलेल्या सामाजिक सुधारणा, स्त्रियांच्या हक्काविषयी घडुन आलेल्या सामाजिक चळवळी स्त्री स्वांत़त्र्याविशयीचे भारतीय आणि पाश्चात्य विचारवंताचे, समाजसुधारकांचे योगदान यातून स्त्रियांना अनेक संधीची दारे उघडी झालेली आपल्याला दिसून येते तरीही आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांचे स्थान आर्थिक विकासातील स्त्रीयांची वंचीतता ही या क्षेत्राच्या विकासामध्ये अडथळा आणू शकते. त्यामुळे आर्थिक क्षेत्रामध्ये स्त्रियांचा सहभाग वाढविणे अत्यंत महत्वाचे असल्याचे आपणास यातून कळते.
जोपर्यंत आपण स्त्रियांचे केवळ आर्थीकच नव्हे तर सामाजिक, राजकीय, धार्मीक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोठया प्रमाणात सामीलीकरण करून घेणार नाही. तोपर्यंत देशाचा सर्वांगिण विकास झाला असे आपणास म्हणता येणार नाही म्हणुन ज्याप्रमाणे कौटुंबिक कार्यात स्त्री पुरूषांच्या बरोबरीने आर्थीक कार्यात सहकार्य करून आपला महत्वाचा सहभाग दर्शवीत असते. त्याचप्रमाणे देशाच्या विकासात सुध्दा तिला बरोबरीने सामील करून घेणे काळाची गरज आहे. जर तिला या कार्यातून दूर करण्याचा प्रयत्न झाला तर ते नक्कीच आर्थीक विकासात मारकच ठरेल.