Authors : प्रा. सुरेश आर. लोनबले
Page Nos : 318-322
Description :
क्रांतिज्योती सावित्रीबाई म्हणजे एकोणिसाव्या शतकातील स्त्रीरत्न असून त्यांनी स्त्रीशुद्राच्या आणि दीनदुबळयांच्यासाठी केलेले कार्य हे खऱ्या अर्थाने क्रांतिकार्य असून या कार्यामुळे भारताच्या सांस्कृतिक इतिहासात एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. भारतातील पहिली भारती शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्रीशुद्र व अनाथांची माता आणि स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या प्रणेत्या म्हणून त्यांचे जीवन अमर झाले आहे. स्त्री ही एक मानव आहे आणि पुरूषाइतकीच कर्तबगारी ती करू शकते हे सावित्रीबाईने स्वतःच्या कृतीने सिध्द करून दाखविले म्हणूनच स्त्रीपुरूष समानता प्रतिपादणार्या आद्य महिला आणि स्त्रीची प्रतिष्ठा प्रतिपादन करणारी पहिली भारतीय स्त्री सावित्रीबाईच ठरते. द्वितीय महायुध्दाच्या नंतर अस्तित्वात आलेल्या युनोच्या (संयुक्त राष्ट्रसंघ) महासभेने मानवाधिकार आयोगाने तयार केलेल्या मानवी हक्काच्या जाहीरनाम्याला मंजुरी दिली दरवर्षी 10 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस म्हणून जगातील सर्वच्च देशामध्ये साजरा केल्या जातो. सदर जाहीरनामा प्रसिध्द होण्याच्या शंभर वर्षापूर्वी सावित्रीबाई फुले यांनी केलेले समाजकार्य व त्यांनी लिहिलेले साहित्य (काव्यफुले 1854, बावनकशी सुबोध रत्नाकर 1892) यातून मनवाधिकाराच्या व हक्काच्या पाऊलखूणा मोठया प्रमाणात जाणवतात.