Authors : प्रिया वि. सोनटक्के
Page Nos : 312-317
Description :
भारतीय संविधानातील मुलभूत अधिकार लोकशाहीच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण मानली जातात. समता, स्वातंत्र्य, न्याय, व बंधुता या लोकशाही तत्वाचे मिश्रण त्यामध्ये आढळून येते. व्यक्तीस्वातंत्र्याची जोपासना करण्यासाठी संविधानाने नागरीकांना 6 प्रकारचे मुलभूत अधिकार बहाल केलेले आहेत. या मुलभूत अधिकारामुळे भारतीय नागरीकांचे व समाजातील अल्पसंख्याक घटकांचे राज्यकत्र्याच्या स्र्वेराचारी एकांगी कृत्यापासून संरक्षण करण्यात आले आहे. राज्यांनी ध्येय धोरणे ठरवितांना स्वार्थी राजकारणापासून अलीप्त राहून सार्वजनिक हिताकडे लक्ष द्यावे.
मनुष्याला चांगले जीवन जगण्यासाठी जे अधिकार अत्यंत आवश्यक असतात. त्यालाच मुलभूत अधिकार म्हटले जाते. मुलभूत अधिकारातून व्यक्ती स्वातंत्र्याची जपणुक होत असते. कारण मुलभूत अधिकारावर अतिक्रमण झाल्यास न्यायालयात दाद मागता येते. मुलभूत अधिकरामुळे नागरीक स्वातंत्र्याची हमी प्राप्त होते. मुलभूत अधिकार निरंकुश असतात असे नाही तर व्यापक समाजहीताचा विचार करून त्यावर काही बंधने घातलेली आहेत.