Authors : प्रा. सुप्रिया रा. सादलवार
Page Nos : 300-305
Description :
प्रस्तुत विषयात चारशे वर्षाचा इतिहास लक्षात घेतला तर प्रत्येक शंभर वर्षाने जागतिक पातळीवर दुर्धर आजाराने हाहाकार माजविला. त्यात कोटिंच्या घरात नागरिक दगावले आहे. 2019-20 मध्ये कोरोनारूपी आजाराने थैमान घातले. आजपर्यंत जगात कोटींमध्ये तर देशात लाखात नागरिकंाचा कोरोनाने मृत्यू झाल आहे. 1720 मध्ये प्लेग आजाराने जगात थैमान घातले होते अनेक लोक मृत्यूमुखी पडले, 1820 मध्ये काॅलरा आजार समोर आला. त्यात भारत, जपान, अरब देशांसह चीन अशा जगातील विविध देशांना कचाटयात घेतले. 1920 च्या काळात फ्लूची लागन जगातील विविध देशातील लोकांना झाली. त्याची सुरूवात 1918 मध्ये झाली. 1920 मध्ये उग्ररूप धारण केले. 2019 पासून चीन देशातून जगाच्या वेगवेगळया देशात कोरोनाचा प्रसार झाला. व आजही देशात कोरोनाचा थैमान सुरूच असून, मृत्यूदराचा आकडाही वाढला आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रात झाला असून ग्रामीण भागाला जास्त झळ पोहचली. सर्वच शेतकऱ्यांना जवळ स्वतःची जमिन असते असे नाही तर काही मजूरी वर काम करून जगातात. त्यामुळे रोजगार , खायला अन्न नाही, मालाला किंमत नाही, अशी परिस्थितीचा सामना ग्रामीण अर्थव्यवस्थेला करावा लागला.