Authors : प्रा. डाॅ. रवींद्र बापुराव शेंडे
Page Nos : 292-295
Description :
भारत 75 वा स्वातंत्र्यमहोत्सव 15 ऑगस्ट 2022 मध्ये साजरा करीत आहे आणि शतकोत्सवाच्या प्रवासाला सुरवात करीत आहे. ही निश्चितच जमेची आणि गौरवाची बाब असतांना वर्तमान स्थितितही तीव्र समस्या म्हणून ज्या समस्यांची ओळख भारतीय अर्थव्यवस्थेत आहे, त्या समस्या म्हणजे आर्थिक विषमता, महागाई, बेकारी, गरिबी आणि काही तात्कालीन समस्यांवर ”लोकशाही हा विचार गट आहे“ याचा पूर्णता वापर करून वरील समस्या नष्ट करणे अतिआवश्यक आहे.भारत हा जगातील अतिप्राचीन, शांतताप्रिय, खेड्यांचा, संस्कृतीप्रिय, जैवविविधता समृध्द, सर्व प्रकारची विविधता समृध्द देश असतांना विकसनशीलतेचा प्रवास अजून का संपला नाही याचा इतिहास खरोखर तपासणे वर्तमान पिढीला भाग झाले आहे. ”नवा भारत“ नवीन पिढि दुरूस्त करू शकते परंतु या पिढीला आवश्यक आहे, विषमताविरहीत वारसाहक्काचे प्रोत्साहन, असा वारसाहक्क मिळाल्यास विकास मोठा बनणारा आहे.जगाच्या पाठिवर निवडक देशच जैवविविधतेने समृध्द आहे. त्यात भारताचा क्रमांक लागतो. असा समृध्दतेचा वारसा असूनही वरील समस्या दुरूस्ती करण्यात प्रशासन असफल का होत आहे ? आणि सामान्य मनुष्य श्रीमंताच्या वागणूकीची किंवा श्रीमंत देशातील वर्तणूकीची नकल करीत असल्यामुळे तो साध्या-साध्या संधीना सोडत जात आहे काय? याचाही फेरविचार होणे अतिआवश्यक आहे. अतिरिक्त उत्पादन क्षमता अशा प्रभावामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे काय ? निर्माण होत असल्यास, तीव्र समस्यांच्या दुरस्तीसाठी अतिरिक्त-क्षमता नष्ट करणे प्रथम आवश्यक आहे.