Authors : प्रा. दिगंबर भऊरावजी टुले
Page Nos : 286-291
Description :
ग्रामिण आरोग्यच्या सोई सुविधा तयार करणे, त्यांना स्थानिक पातळीवर शहरी आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्या, कुपोषण नाहिसे व्हावे, स्वच्छता, औषधोपचार, या करीता केंद्र आणि राज्य सरकार मोठया प्रमाणावर काम करीत आहे. आरोग्य सोई सुविधा ग्रामिण क्षेत्रात वाढाव्या या करीता व्यवसायाचे सामाजिक जबाबदारीचे आरोग्य उपक्रमकाम करीत आहे. कंपनी कायदा 2013 च्या कलम 135 नूसार प्रत्येक उद्योगांना सामाजिक योगदान कायदयाने बंधन कारक केलेले आहे. ज्या उद्योंगाची किमान तीन वर्षाचे सरासरी उत्पन्न 500 करोड आहे किंवा ज्यांची एकुण वर्थ 1000 करोड आहे त्याना सामाजिक दायित्वासाठी किमान 2 टक्के निधी एका आर्थिक वर्षात खर्च करणे आवश्यक आहे. प्रस्तुत संशेाधन लेखात व्यवसायिक सामाजिक जबाबदारीचा आरोग्य उपक्रमाचा ग्रामिण आरोग्य सेवेतील योगादानाचे महत्व आणि परिणामाची मांडणी करणार आहे.