Authors : कु. उज्वला गिरीधर नागोस
Page Nos : 188-191
Description :
प्रस्तुत लेखामध्ये डॉ. पंजाबराव देशमुखांनी जे कृषी क्षेत्रात व शिक्षण क्षेत्रात कार्य केले त्याचा जागतिकिकरणात अतिश्य मोलाचा वाटा आहे हे बघीतले आपला देश हा कृषिप्रधान आहे. त्यामुळे कृषि विभागाकडे जास्त लक्ष पुरविने गरजेचे आहे. जागतिकिकरणात टिकून राहण्यासाठी आपल्या कडील वस्तु ही उत्कृष्ट दर्जाची असणे आवश्यक आहे. त्याकरिता ती वस्तु तयार करणाऱ्यां व्यक्तींना त्या वस्तुचे सखोल ज्ञान असने आवश्यक आहे म्हणून डॉ. पंजाबराव देखमुख कृषि विद्यापिठ यांच्या तर्फे शेतकऱ्यांसाठी विविध मेळावे व चर्चासत्रे घेतली जातात. ज्यात आधूनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना पुरविली जाते. वेगवेगळे संषोधन करुन शेती करीता लागणारे यंत्र व अवजारे यात सुधारणा, सुधारित बी बियाणे या प्रकारचे कार्य डॉ. पंजाबराव देश्मुख कृषि विद्यापिठात केले जाते.
शेतीकडे लक्ष देतांना शेतकऱ्यांचे आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांना प्रवेशाच्यावेळेस अग्रक्रम देण्यात येईल. त्यांना फी सवलत असेल. ज्यामुळे त्या मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होईल. महिलांकरिता सुध्दा डॉ. पंजाबराव देश्मुख यांनी महाविद्यालयात शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली.
डॉ. पंजाबराव देश्मुख यांनी केलेले कृषि क्षेत्रातील व शिक्षण क्षेत्रातील कामगिरी जागतिकीकरणाला महत्वाची ठरली त्याचे कार्य व्यक्ती सोबतच संपूर्ण देशाला विकासाकडे वाटचाल करायला लावतात.