Authors : छाया कि. बडोलेे
Page Nos : 53-59
Description :
मानवाधिकार (मानवी हक्क) 21 व्या शतकात हा एक महत्वाचा प्रश्न बनला व 10 डिसेंबर 1948 रोजी घोषित करण्यात आलेल्या मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा व त्यांच्या प्रगतीचा निर्धारण करण्यासाठी आहे मानवी हक्कांचा संकल्पनेनुसार प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असायला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या हक्कांची भागीदार आहेत. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या जात, धर्म, वंश, वर्ण, उच्च नीच, गरीब-श्रीमंत, राष्ट्र भाषा असा कोणताही भेदभाव न करता मिळाला पाहिजे विशेषतः त्यामध्ये दिसून आलेली धार्मिकता, प्रस्थापित रूढी, समाजव्यवस्था देषातील प्रचलीत कायदे यामुळे अनेकांना मानवी हक्क नाकारले गेले आहेत आणि अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मानवी हक्क म्हणजे नैसर्गिक अधिकारांचे धर्मनिरपेक्ष रूप आहे. प्रत्येकांना जगण्याचा स्वातंत्र्य उपभोगण्याचा व सुरक्षित असण्याचा अधिकार आहे. प्रत्येकास प्रत्येक राष्ट्राचा हद्दित संचार व वासत्व्य करण्याचे स्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे. नियोजित जोडीदारांनी स्वेच्छेने व पूर्ण संमती दिली असेल तरच विवाह करावा. महिलांना मिळालेले प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचे अधिकार हे 73 व्या घटनादुरूस्तीने सांगितले आहे. महिलांना आधीच्या काळी फक्त चूल आणि मूल इतकेच मर्यादीत ठेवले जात असायचे परंतू 93 व्या घटनादुरूस्ती मध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात आले आहे व 2009 मध्ये पुरूषांच्या बरोबरीने जगण्याचा अधिकार म्हणजे 50 टक्के आरक्षण देण्यात आले. परंतू आज बघितले तर प्रत्येक स्त्रिचे हे पुरूषांपेक्षा प्रत्येक क्षेत्रात मोठी प्रगती केलेली आहे व आजची स्त्री ही शक्तीशाली बनलेली आहे. मानवाधिकारामध्ये त्यांचे कार्य व अधिकारांची माहिती हेन्री डेव्हीड थेरो, न्यू लेकसीन या शास्त्रज्ञांनी सुध्दा मानवी हक्कांच्या तक्रारींची माहिती त्यांचे महत्व, अधिकार, रचना वर्गीकरण दृष्टिकोन, वैश्वीकरण, अडथळे, महिलांच्या समस्या, महिला सबलीकरण, प्रयत्न आणि उपाययोजनांचे व त्यांच्या आयोगांची कार्ये आणि जीवनाचा अविभाज्य घटक, समस्या अशा अनेक महितीसाठी व त्यांचे महत्व यामध्ये सांगितले आहे.