Authors : प्रा. सौ. ज्योती देषपांडे
Page Nos : 40-42
Description :
भारताच्या प्रगतीत महिलांचे योगदान नेहमीच वाखाण्यासारखे आहे. प्रत्येकच क्षेत्रात महिलांनी प्रगती केलेली आपण बघतोच आहोत. स्वातं़त्र्योत्तरकाळात मंद गतीने का होईना पण महिलांची सर्वच क्षेत्रात भागिदारी आपणास पाहायला मिळते. याकरिता समाजसुधारकांपासून ते केंद्र आणि राज्य सरकारांनी ही वेगवेगळया योजनांच्या द्वारे बरेच प्रयत्न केलेत. राजकारण, समाजकारण, व्यवसाय-उद्योग क्षेत्र, कलाक्षेत्र असो की क्रिडाक्षेत्र आपल्या कठोर परिश्रमाने, चिकाटीने, ज्ञानाने आणि संघटन कौषल्याने तिने भारताला जागतीक पातळीवर नेवून ठेवले आहे. या तिच्या कामाची दखलही समाजाने घेतलेली आहे. पण विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संषोधना मध्ये महिलांचे प्रमाण त्या मानाने कमी आहे असे दिसते. ही बाब लक्षात घेवून सरकारनेही काही योजना राबविल्या आहेत. त्यांचा तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी करणाÚया काही महिलांचा अल्पसा परीचय या लेखात करण्यात आलेला आहे.