Special Issue Description


Authors : डॉ. संजय मारोतराव महाजन

Page Nos : 264-266

Description :
ऑगस्ट 1947 मध्ये जन्माला आलेला भारत आजवर अनेक कठीण प्रसंगांना समोरा जात आलेला आहे. पण सध्याचा काळ आपल्या देषासाठी सर्वाधिक आव्हानात्मक काळ ठरू शकतो. याचे कारण, काविड-19 या साथीच्या रोगाने देषासमोर अनेक आर्थिक संकटे निर्माण केली आहेत. शिक्षण, आरोग्य, वस़्त्रोद्योग, विमानसेवा, पर्यअन, आणि आदरातिथ्य अषा रोजगार निर्मिती करणाऱ्या व्यवसायांचे या साथीने प्रचंड नुकसान केले आहे. इतकेच नव्हे तर या कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव पडला असेल तर तो असंघटित क्षेत्रातील कामगारांवर देषातील अर्थव्यवस्थेचा कणा समजला जाणारा हा असंघटित वर्ग ज्या कामगारांच्या भरोवषावर उत्पादन घेतले जाते तो या लाटेमध्ये भरडून निघालेला दिसतो. कारखाण्यात काम करणारा मजूर, खाणीत काम करणारा कामगार, ढकलगाडीवर भाजीपाला मांडून दारोदारी फिरणारा भाजीपाला विक्रेता, घरोघरी भांडी- कपडे धुनी करणारी मोलकरीन, रस्त्याच्या कडेला आपली चहाची टपरी टाकून आपला उदरनिर्वाह करणारा चहा विक्रेता, षेतीवर काम करणारा षेतमजूर, वीट भट्टीवर काम करणारे मजूर, साफ-सफाई करणारा सपाई कामगार हे सगळे असंघटित मजूर, हे असंघ्टित मजूर हातावर आणुन पोटावर खाणारे, कुठलाही बॅंक बॅलेन्स नाही, कुठलीही गुंतवणूक नाही, अषा या असंघटित मजूरांवर या माहामारीचां प्रभाव पडलेला दिसतो. आपल्या देषात 90 टक्के नोकऱ्या हया असंगटित क्षेत्रात आहे. रिक्षावाला, हातगाडीवाला, टॅक्सीवाले, रस्त्यावरचे खेळणी विक्रेते, चहाटपरी चाविणरे, गॅरेजवाले, बांधकाम क्षेत्रात काम करणारे कुषल व अकुषल कामगार अषा हातावर पोट असलेल्या लोकांच्या रोजगारावर कोरामुळे संकटे आली. कारोना येण्याच्या पूर्वी देषातील 7 टक्के असणारा बेकारीचा दर या महामाराच्या काळात 25 टक्क्यापर्यंत पोहचल्याचा अंदाज भारतीय अर्थव्यवस्था निरीक्षण केंद्राने (द सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी) वर्तवला आहे.

Date of Online: 30 March 2022