Authors : प्रा. डॉ. प्रकाश मारोतराव वांढरे
Page Nos : 257-259
Description :
भारताच्या अर्थव्यवस्था ही कोरोना येण्यापुर्वी नोटबंदी व जीएसटी अशा प्रकारच्या उपाययोजंना केल्यामुळे आर्थिक अडचणीत असतांना कारोना ही जागतिक माहामारी आल्यामुळे आपला देश हा आर्थिक अडचणीत सापडला आहे.आपल्या अर्थव्यवस्थेची गती नोटबंदी व जीएसटी मुळे अडथळे निर्माण झालेत.त्यानंतर परत लॉकडाउन मुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे आठ ते नऊ लाख करोड रूपये नुकसान झाले असा अदांज आहे. लॉकडाउन मुळे रस्ते वाहतूक , विमान वाहतूक, रेल्वे वाहतूक, जल वाहतूक सपुर्णता ठप्प झाली आहे. त्यांचा परीणाम म्हणजे पर्यटन व्यवसाय , दागदागीने व्यवसाय, वस्तू व सेवाची निर्मीती करणारे उद्योग या सर्वावर वाईट असा प्रभाव पडला आहे.
प्रामुख्याने षेती व्यवसायावर सुध्दा कोरोनाचा प्रभाव पडला आहे.लॉकडाउन मध्ये षेती मध्ये उत्पादीत हेाणारा माल , भाजीपाला, फळे दुध व नाशीवंत वस्तू हया बाजारपेठेपर्यन्त पाहचू शकल्या नाहीत. हा सर्व माल हा जाग्यावरच नाश पावला आहे.
कोरोनाच्या माहमारीमुळे काही अनूकूल स्वरूपाच फायदे सुध्दा पाहावयास मिळाले आहे . या मध्ये उदा. ई व्यापारात वाढ, साबन सॅनीटायझर औषधी मास्क इ. ची वाढलेली मागणी या मध्ये पर्यावरणचा फायदा झाला आहे देशातील प्रदूषणामध्ये मोठया प्रमाणात घट झाली आहे.भारतीय अर्थव्यवस्थेची आत्मनिर्भतेकडे वाटचाल हे फायदे कोरोनाच्या माहमारीमुळे झाले असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान कधीही भरून न निघणारे आहे.
कोरोनाच्या माहमारीपासून लोकांना वाचविण्या साठी सरकारला अनुत्पादक कार्यावर मोठया प्रमाणावर खर्च करावा लागला आहे. कोरोनाच्या माहमारीमुळे सुमारे दोन वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रामधुन बेरोजगाराचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. उद्योगासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याची मालाची मागणी सुध्दा कमी झाली आहे.त्यामुळे सामान्य जनतेचे उत्पन्न कमी झाले आहे. वस्तूच्या मागणीवर सुध्दा मोठया प्रमाणावर कमी आलेली आहे. यामुळे अर्थव्यवस्था एक प्रकारे दृष्ट चक्रात सापडलेली आहे. त्याचा परीणाम म्हणून आर्थिक विकास दर कमी झाला आहे. आशिया विकास बॅकेच्या मते 2021-22 मध्ये भरतीय विकास दर 5.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे