Authors : प्रा. अंजली पवार
Page Nos : 33-36
Description :
संतश्रेश्ठ तुकाराम महाराज हे आपल्या महाराश्ट्राचे लाडके दैवत म्हणून मानले जाते. महाराश्ट्रात त्यांचे नाव अगदी आदराने घेतले जाते. तुकारामांच्या चरित्राचा विचार केला तर सतत असे वाटत आलेले आहे की, हा जो संत आहे तो त्यांच्या संसाराचा वाताहात झाल्यामुळे दुःखी निटपणे संसार न करू षकलेला, भक्तीकडे वळलेला एक साधारण व्यक्ती आहे. पण वस्तुस्थिती अषी आहे की, इथे समाजमनावर प्रभाव गाजवत असलेल्या अहंकारी, उद्दाम व धर्माच्या नावावर अनीनीच बाजार मांडणाÚया अषा लोकांना त्यांनी कडकडून टिका केलेली दिसते व यासाठी त्यांची अभंगवाणी ही एका षस्त्राचेच काम करतांना आपल्याला दिसते. स्वतः तुकारामांना आपल्या पांडित्य व साधुत्व यांचा कुठलाही अभिमान नव्हता. म्हणूनच विठ्ठलाने माझे जाणते मी पण जाळावे मी नेणताच बरा आहे, असे त्यांनी आपल्या अभंगातून स्पश्ट मत मांडलेले आहे.