Authors : नरेश रोहीदास धुर्वे
Page Nos : 252-256
Description :
जगातील सर्वच देषांमध्ये आदिवासी जमातीचे अस्तित्व आहे. विभिन्न देषांमध्ये त्यांना वेगवेळया नावाने संबोधले जाते. उदा. अमेरिकेत त्यांना रेड इंडियन्स (Red Indians) ऑस्टेलियात एबोरिजिन्स (Aborigines) आणि युरोप खंडातील देशांमध्ये जिप्सी (Gypsy) या नावाने संबोधिले जाते. आफ्रिका खंडामधील देशांमध्ये आदिवासींच्या समुहाला Tribal म्हणजे जमात या नावाने संबोधिले जाते. आजही आफ्रिका, आशिया आणि अमेरिका खंडामधील देशांमध्ये मोठया प्रमाणावर आदिवासी जमाती आहेत. युरोप खंडातील देशांमध्ये मात्र त्यांचे फार झपाटयाने आधुनिकीकरण झाले आहे. व होत आहे. यामुळे येथे जमात म्हणून त्यांचे स्वतंत्र अस्तित्व ओळखणे कठीणप्राय झाले आहे. संख्यात्मकदुश्टया सर्वात जास्त आदिवासी जमाती आफ्रिका खंडानंतर केवळ भारतातच आहेत. वास्तविकता यांचे जिवन म्हणजे गंगेसारखे पवित्र, हिमालयासारखे उदार, व्यापक आणि धरतीमातेसारखे सहिश्णू आहे. निष्चितच हया आदिवासी समाजाच्या प्रती आत्मियता प्रस्तापित करणे म्हणजे परमेश्वराची खरी उपासना आहे. ख-या धर्माला स्विकारणे आहे आणि मानवतेची खरी आराधना आहे आणि हेच खरे तर समाजकार्य आहे.
भारत हा एक विकसनशील देश असून 21 व्या शतकात त्याची वाटचाल सुरू आहे. भारताला स्वातंत्र मिळून 74 वर्ष पुर्ण झालेली आहेत. या कालावधीत भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केलेली आहे. पंरतु अजूनही काही भागांचा विकास काही अनुसूचित जमातींचा विकास पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही.