Authors : प्रा. डॉ. माधुरी ना. कोकोडे
Page Nos : 21-23
Description :
विकसनशील भारताला, विकसीत भारताकडे नेण्यासाठी शारीरिक सुदृढता व मानसिक स्थिरता या दोन घटकांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. शारीरिक सुदृढतेतून व मानसिक स्थिरतेतून व्यक्तिमŸवाची जडणघडण होते. पण आधुनिक काळात मानवाच्या आहारातून शारीरिक सुदृढता व विहारातून मानसिक स्थिरतेचा र्हास होत आहे ही चिंतनाची बाब आहे. याचे कारण आपण मृगजळाप्रमाणे जे मिळेल, समोर येईल, दिसेल, त्यामागे धाव घेत आहोत व शारीरिक स्वास्थाकडे, मानसिक स्वास्थाकडे, विकासाकडे दुर्लक्ष करीत आहोत.शारीरिक सुदृढतेकरीता आरोग्यसंपन्न जीवनशैली भरपूर प्राणवायू, शरीरश्रम व्यायाम, शुद्ध जल, पोषक व संतुलित आहार, सूर्यप्रकाश, शांतता, निरोगी मन, गतिपूर्वक उत्सर्जन क्रिया, ध्यान अत्यावश्यक आहे. विकसनशील भारताचे नेतृत्व करण्यासाठी सशक्त, आरोग्याने सुदृढ व मनाने स्थिर अशा नागरीक ही काळाची गरज आहे.