Authors : श्री. निलेश चंपतराव काळे
Page Nos : 283-285
Description :
जगात सर्वात मोठी लोकसंख्या असलेला भारत देश आहे. यात निवडणूक प्रकीया तेवढीच विशाल स्वरूपाची आहे. निवडणूकीतील मतदारांची संख्या, मतदान केंद्र आणि कर्मचारी वर्ग यावरील खर्च इत्यादी सर्व प्रकाराने भारतीय लोकप्रतिनिधीच्या निवडणूका हा प्रचंड विस्ताराचा कार्यक्रम आहे. आणि या संपुर्ण कार्यक्रमाची जबाबदारी हि भारतीय निवडणूक आयोगावर आहे.
या संदर्भात चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील मतदारांच्या मतवर्तनाकडे पाहिल्यास असे दिसुन येते की, या संघातील मतदारांवर विविध गोष्टींच्या प्रघात हा मतवर्तनावर दिसून येतो की, ज्या प्रमाणे राष्ट्रीय व प्रादेषिक स्तरावर असामाजिक तत्व, प्रसारमाध्यमे, विचारसरणी, राजकीय विचारधारा पैशाची ताकद, अल्पसंख्यांखाची असुरक्षेतेची भावना आणि भ्रष्ट असा निवडणूक प्रचार व चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी इत्यादी घटक मतवर्तनात प्रभावित करणारे महत्वाचे घटक आहे. काही प्रमाणात हेच घटक चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील व्यक्तीच्या मतवर्तनावर प्रभाव टाकतांना दिसतात.