Authors : डॉ. संजय एस. भुतमवार
Page Nos : 238-240
Description :
आजचे युग हे गतिमान व माहिती तंत्रज्ञानाचे युग असल्यामुळे दिवसेदिवस माहिती निर्मितीचा वेग वाढतच आहे. त्यामुळे या वाढणाऱ्या माहितीचा किंवा वाचन साहित्यांचा त्वरित वाचकांपर्यत पोहचविणे आवश्यक झालेले आहे. आजच्या तंत्रज्ञान युक्त काळात वाचकापर्यत त्वरित माहिती पोहचविणे पारंपारिक ग्रंथालयातुन शक्य होत नाही यावर उपाय म्हणुन डिजिटल गंथ्रालय एक काळाची गरज बनली आहे. ग्रंथालय व माहितीशास्त्र हे माहिती तंत्रज्ञानाशी संबधित असल्यामुळे डिजिटल ग्रंथालयाचा विकास हा त्यातील एक प्रगतीचा भाग आहे. ग्रंथालय व माहितीशास्त्रामध्ये काम करणाऱ्यापुढे आज माहितीतंत्रज्ञाचे एक मोठे आव्हाण समोर उभे आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आधुनिक ग्रंथालयाचे स्वरुप हे संगणकीय ग्रंथालये,
इलेक्ट्रॉनिक ग्रंथालये, डिजीटल ग्रंथालये आणि आभासी ग्रंथालये असे झालेले आहे. या बदलामुळे वाचकांना जलदगतीने वाचनसाहित्य व ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन देणे अपरिहार्य ठरत आहेत. आणि याची परिणीती म्हणजे डिजिटल ग्रंथालयाचा उदय हेेाय.