Authors : प्रा. सतीश सहदेवराव कर्णासे
Page Nos : 232-237
Description :
प्रत्येक व्यक्तीला जन्मजात काही हक्क मिळालेले असतात. मानवाधिकार ही विसाव्या शतकामध्ये उदयास आलेली संकल्पना आहे. सज्ञान स्त्री- पुरुषाला स्वतःच्या विचारानुसार विवाह करण्यात त्याचा हक्क आहे. राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला प्राथमिक शिक्षण मिळविण्या हक्क आहे. प्रत्येक व्यक्तीला विचार सद्सद्विवेकबुद्धी आणि धर्म यांच्या स्वातंर्त्याचा हक्क आहे महात्मा फुले यांनी आपल्या कार्याची सुरुवात स्त्री शिक्षणापासून केली. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात स्त्रियांना शिक्षण देऊन स्वावलंबी करण्याचे ध्येय समाज सुधारकांनी मनाशी बाळगले. मराठी साहित्यात स्त्रियांचे स्थान मानाचे आहे. आधुनिक काळातील स्त्रीला आत्मभान आल्यामुळे जीवनातील विविध पातळीवर, पातळीवरील संघर्ष करीत, ताणतणावांना तोंड देत खंबीरपणे लढावे लागले. आधुनिक काळामध्ये स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात स्त्रियांवर लेखन केले आहे. वेगवेगळे साहित्य अभ्यासून कविता लेखन, कादंबरी लेखन ,कथालेखन, नाट्यलेखन केलेले आहे.