Special Issue Description


Authors : प्रा. आषिश रामदास देरकर

Page Nos : 222-226

Description :
कोरोनाने संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला डबघाईस आणले. भारतातही कोरोनाचा फार प्रसार झाला. प्रचंड प्रमाणात वाढता संसर्ग व स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही देशात आरोग्यविशयक सोयी-सुविधांच्या अभावामुळे देशात मृत्यूसंख्येत वाढ होऊ लागली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 24 मार्च 2020 रोजी केंद्र व राज्य सरकारने संचारबंदीची घोषना केली. अनियोजित संचारबंदीमुळे अनेक लोकांना रोजगाराच्या ठिकाणाहून स्थलांतरीत होऊन स्वगावी परतावे लागले. त्यात लाखो लोकांचा रोजगार हिरावल्या गेला. त्याचा विपरित परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला. बेरोजगारीचा दर वाढला. कोरोना विशाणूमुळे अर्थव्यवस्थेतील दुग्ध व्यवसाय, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार व्यवसाय, शेती व्यवसाय, पर्यटन क्षेत्र, उत्पादन क्षेत्र, रिक्षाचालक, वाहतूक व्यवसाय व बांधकामासारख्या मोठ्याा व्यवसायावर कसा विपरित परिणाम झाला व त्याची अर्थव्यवस्थेला कषी झळ पोहचली याचे विष्लेशण या शाेध निबंधात करण्यात आले आहे. सकारात्मक दृष्टीकोन बाळगून परिस्थितीवर मात करण्यासाठी केवळ शासनच नाही तर प्रत्येक नागरिकांनी सुध्दा प्रयत्न करण्याची गरज आहे. आलेल्या संकटांवर मात करून नवे क्षितीज गाठण्यासाठी प्राथमिक, द्वितीय व तृतीय क्षेत्रात नवनिर्माण करण्याची व अर्थव्यवस्थेला बळ देण्याची आवश्‍यकता आहे. तरच आपण प्रगतीची उंच शिखरे गाठू शकणार.

Date of Online: 30 March 2022