Authors : प्रा.सौ. वासंती देवनाथ खाडिलकर/देवीकर
Page Nos : 210-213
Description :
समाज आणि कुटूंबाच्या उज्वल भविश्याकरिता महिला सक्षमीकरणाची आवश्यकता आहे. महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना त्याच्या वैयक्तीक विकासासाठी व सामाजिक विकासासाठी स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम करणे तसेच महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे, त्यांना त्यांचे सर्व निर्णय स्वतः घेण्यास सक्षम करणे. भारतात महिला सक्षमीकरणाला सतत प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे महिला शारिरीक मानसिक आणि सामाजिक दृष्टया सक्षम होतील. देशाला सक्षम बनविण्याकरिता आदि महिलांवर होणारे अत्याचार थांबविणे आवश्यक आहे. जेणेकरून महिलांचा विकास होईल आणि ते देशाच्या विकासात आपली भुमीका बजाऊ शकतील बर्याच संघर्षानंतर स्त्रियांना मतदानाचा अधिकार, मालमत्तेचा अधिकार, नागरी हक्क, विवाह आणि नौकरीच्या बाबतीत कायदेशीर संरक्षण मिळाले आहे. महिला आणि किशाेरावस्थेतील मुलींच्या सुरक्षीततेसाठी ‘‘बेटी बचाओ बेटी पढाओ’’ उज्वला योजना किशाेरी कौशल्य योजना, महिला हेल्पलाईन योजना, निवडणूकांमध्येदेखील महिलांकरिता आरक्षीत जागा ठेवल्या जात आहे. यांसारख्या कल्याणकारी योजना भारत सरकारद्वारे राबविण्यात येत आहे. महिला संक्षमीकरणाचा खरा अर्थ तेव्हा समजेल जेव्हा त्यांना भारतात चांगले शिक्षण दिले जाईल आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास सक्षम बनविले जाईल. प्रस्तुत शाेधनिबंधात सरकारी योजनेचे महत्व याचा आढावा घेण्यात येत आहे.