Authors : डॉ. कविता आर. बोरकर
Page Nos : 192-196
Description :
‘महिला सबलीकरण’ ही संकल्पना महिलांच्या विकासाच्या संदर्भात रूढ झाली आहे. पावलो फ्रोरे यांनी सर्वप्रथम ही संकल्पना उपयोगात आणली. अबला महिलांना सबला करणे, त्यांना हक्क व संधी देणे. हा उद्देश त्यांना अभिप्रेत होता.
स्त्री म्हणजे निसर्गरूपी चित्रकाराच्या कुंचल्यातून साकारलेली एक अप्रतिम कलाकृती आणि या कलाकृतीला पूर्णत्व बहाल करण्यासाठी या चित्रकाराने तिच्यात वैविध्यपूर्ण छटा किंवा रूपे साकारली, ज्याची प्रचिती आपल्याला तिच्या प्रत्येक भूमिकेतून येते. नवसृष्टी निर्माण करण्याची क्षमता असणारी हळवी स्त्री असो, तर कधी कुटूंबाला सर्वस्व अर्पण करणारी त्यागी स्त्री असो आणि प्रसंगी रणरागिणी दुर्गा बनून नरसंहार करणारी स्त्री असो. सर्व भूमिकांना योग्य न्याय देण्याची कला तिच्यात उपजतच आहे.
भारतातील स्त्रीमुक्तीच्या कामगिरीत डॉ. आंबेडकर यांचे योगदान मोलाचे आणि क्रांतीकारक आहे. वंचित, शोषित, पीडित महिला वर्गाच्या सबलीकरणासाठी, सक्षमीकरणासाठी त्यांची कामगिरी ही आधारभूत आणि साहाय्यक आहे.
सूचना व उपाययोजना:-
1) विविध शासकीय योजनांची माहिती ग्रामीण व शहरी महिलापर्यंत पोहजविण्याचा प्रयत्न व्हावा, जेणेकरून त्यांना त्याचा लाभ घेता येईल.
2) अर्थसहाय्याची विविध माध्यमे व पध्दती यांचे प्रषिक्षण ग्राम प्रषासन स्तरावर दिले गेले पाहिजे व सवलतीचे असले पाहिजे.
3) स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन मिळावे.
4) अर्थाजनाच्या योग्य संधी उपलब्ध करून स्त्रियांचे आर्थिक सक्षमीकरण करणे उपयुक्त आहे.
5) आर्थिक सक्षमीकरणात स्त्रियांचा फक्त अर्थाजनाचा विचार न करता उत्पादनाच्या साधनांवर मालकी तीला मिळवून देणे जेणेकरून ती स्वावलंबी होईल.
6) महिलांना स्वयंरोजगाराच्या प्रशिक्षणाबरोबरच कायदा, व्यापर व व्यवहारांचे ज्ञान देण्यात यावे. त्यामुळे सामाजिक व कौटूंबिक कलह टाळता येईल.