Issue Description


Authors : डॉ. विजय आनंदराव दरवडे

Page Nos : 228-230

Description :
जागतिकीकरण हे आधुनिक युगातील बदलते रूप आहे. विज्ञान आणि औद्योगिक क्रांती व भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील आधुनिक काळातील जागतिकीकरणाचा अजंठा व त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाची झालेली अधिक प्रगती, व्यापार, अधिकोष प्रणाली, दळणवळण, भांडवलशाहीच्या वाढता सहभाग व जवळीकता यामुळे जग जवळ येण्यास मदत झाली. 19 व्या शतकातील लोकांचे सरासरी आयुर्मान 40 वर्षाचे होते तर 20 व्या शतकात ते 67 पर्यंत पोहोचले आहे. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण व बालमृत्यूचे कमी प्रमाण हे जागतिकीकरण एकमेव उपाय आहे. जागतिकीकरणामुळे दोन देशातील व्यक्तीच्या उत्पन्नातील तफावत कमी अधिक होत आहे. गरीब व श्रीमंत यांची दरी कमी होत आहे. 1990 मध्ये अमेरिकन व्यक्ती चिनी व्यक्तीच्या तुलनेत 12.5 पट अधिक उत्पन्न मिळवत होती. परंतु 1999 मध्ये हे प्रमाण 7.4 पट अधिक मिळत आहे. त्यामुळे आयातीमुळे रोजगार संधी वाढत आहे. बदलत्या काळानुसार म्हणजे जागतिकीकरणामुळे समाजजीवन बळकट होत आहे. त्याचा प्रभाव सर्वच घटकावर होत आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक अशा अनेक संस्था वर परिणाम होऊन समाज जीवन बदलत आहे. भारतीय समाजातल्या सर्व स्तरात बरे वाईट परिणाम सर्वच घटकावर दिसू लागले. त्याचा परिणाम समाज जीवनावर होत आहे. 1990 नंतर आधुनिकता आणि राजकारण यांनी नवे रूप धारण केले. त्यात खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या नव्या धोरणांच्या स्विकारा मुळे भारतीय सामाजिक जीवन कमालीचे बदलू लागले आहे. जागतिकीकरणामुळे शेती उद्योग आणि व्यवसायाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला 12 बलुतेदार यांच्यासमोर रोजगाराच्या समस्या निर्माण झाल्यात. माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जी माहिती उपलब्ध होत गेली त्याचा लोकांच्या परंपरा श्रद्धा आणि संस्कृतीला हादरे बसू लागले आहे. जागतिकीकरण व ग्रामीण समाजजीवनाचे रूप बदलत आहे.

Date of Online: 30 May 2022