Authors : प्रा. डाॅ. जयश्री शास्त्री
Page Nos : 212-215
Description :
ग्रामीणता हे भारतीय प्रदेशाचे मुख्य वैशिष्टये आहे. इ.स. 1875 पासून मराठी साहित्याला आधुनिकता प्राप्त झाली. ते अनेक दिशांनी समृद्ध आणि वैविध्यपूर्ण झाले तरी सामाजिकदृष्ट्याा ते जाणीवांच्या दृष्टीने मर्यादित जीवन कक्षेतच प्रगट होते. मात्र याच दरम्यान म. फुले, राजर्शी शाहू महाराज, महर्षि विठठल शिंदे हे तत्कालीन भेसूर सामाजिक वास्तवाकडे आपले लक्ष केंद्रित करून ग्रामीण या अंतर्गत येणारे शेतकरी, मजूर, कामगार, कोळी आदिवासी, पददलीत हे साहित्याचे विषय होऊ लागले. कोणत्याही साहित्याच्या प्रेरणा शेाधताना त्या साहित्य निर्मितीचा जो कालखंड असतो तो विचारात घ्यावा लागतो.
त्यामुळे साहित्य हा समाजाचा आरसा या बीद्रानुसार ग्रामीण साहित्यातून तत्कालिन परीस्थितीचे पडसाद उमटले. साठोत्तरी कालखंडात आनंद यादव, रा. रं. बोराडे, उद्धव शेळके, चन्द्रकुमार नलगे, शंकर पाटिल, महादेव मोरे, सरोजिनी बाबर, सदांशिव माळी, विश्वास पाटील, सदानंद देशमुख, प्रतिमा इंगोले, भास्कर चंदषिव, राजन गवस, रविंद्र शेाभणे इ. कितीतरी साहित्यिकांनी आजतागायत बदलत्या ग्रामरचनेचे स्वरूप् आणि प्रश्न आपल्या साहित्यातून व्यक्त केले आहेत. त्यांच्या कलाकृतीच्या आधारावरच प्रस्तुत शेाध निबंधातून ग्रामीण परिसराचे परिवर्तन होताना त्याचे पडसाद साहित्यातून कसे उमटत गेले आणि प्रतिभावंत लेखकांच्या साहित्य निर्माणामुळे ग्रामीण विकासात ग्रामीण साहित्यिकांची भूमिका कशी मौलिक ठरली याचे आकलन करून अभ्यास मांडण्याचा प्रयत्न करण्यातत आला आहे.
भारतीय प्रदेषाचे मुख्य वैषिश्ट्य म्हणजे ग्रामीणता उष्ण कटिबंधाच्या या भारतात पठार, डोंगराळ आणि किनारपट्टîाांचा भाग तीन भूरचना प्रामुख्याने दिसत असल्याने शेती हा भारतातील मुख्य व्यवसाय मानला गेला. शेती आणि व्यवसायाच्या विभागणीनुसार भारतीय समाजव्यवस्था ग्रामीण समाज आणि नागरी समाजात विभागलेली दिसून येते. यातील ग्रामीण समाज हा आकाराने लहान, भाशा, संस्कृती, परंपरा या दृष्टीने एकजिनसी आणि षेती व त्या संबंधीच्या जोडधंद्याशी निगडित असतो. ग्रामीण समाज हा खेड्याातून वसला आहे. भारत हा मुख्यतः खेड्याांनी बनलेला देश आहे. या ग्रामीण जीवनाचे चित्रणच ग्रामीण साहित्यातून प्रगटले आहे.