Authors : सतीश स. कर्णासे, डॉ. कोमल वी. ठाकरे
Page Nos : 200-205
Description :
कोणत्याही कादंबरीतील पात्रे ही त्या कादंबरीची निर्मिती असते. कादंबरीत मुख्य पात्रे, गौन पात्रे, आणि इतर पात्रे असतात. ‘बारोमास’ मधील कादंबरीतील सर्वच व्यक्तिरेखा विदर्भातील, मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील आहेत. या कादंबरीमध्ये 93 व्यक्तिरेखांचा समावेश करण्यात आलेला आहे. ‘बारोमास’ मध्ये एकनाथ, अलका, नानू आजचा, सुभानराव, शेवंता माय आणि मधु या महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. एकनाथ ‘बारोमास’ मध्ये शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित पण बेरोजगार तरुणांचे प्रतिनिधित्व करतो. तो शेतकÚयांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करतो. अलका भौतिक सुखाचे आकर्षण असणारी आणि बदलत्या स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारी आहे. सुभानराव हे पात्र हायब्रीड शेतीचा पर्याय निवडणारे आहे. शेवंता माय ही कष्टकरी भारतीय शेतकरी स्त्रीचे प्रतिनिधिधीक खूप आहे. शेवंताबाई च्या माध्यमातून लेखकाने ग्रामीण भागातील स्त्री जीवनाची धडपड आणि ससेहोलपट प्रभावीपणे मांडली आहे. मधू हा सोनेरी टोळीचा मालक असून गुप्तधन शोधण्यासाठी रात्रीची भटकंती करणारा आहे आहे.