Issue Description


Authors : कु. रचना ध. वानखडे, डाॅ. प्रमोद एस. शंभरकर

Page Nos : 197-199

Description :
लोकसहभागातून गावांचा व शहरांचा जास्तीत-जास्त विकास व्हावा यासाठी आपल्या देशाने व राज्याने पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. त्यां व्यवस्थेतून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या संस्थाची अनुक्रमे गाव, तालुका व जिल्हा पातळीवर स्थापना करण्यात आलेली आहे. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थाचा ‘राज्यसुचित’ समावेश करण्यात आलेला आहे. यावरून स्थानिक स्वराज्य संस्थानसंदर्भात महत्वाची भुमिका राज्यशासन घेतांना दिसते. पंचायत राज्य व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी बलवंत राय मेहता समिती, 1957 चे महत्व 73 व 74 घटना दुरूस्तीचे महत्व अन्यसाधारण आहे. स्थानिक स्वराज संस्थांचे दोन प्रकार पडतात जसे की ग्रामीण विकासासाठी जिल्हापरिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत तर शहरी विकासासाठी महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांचा समावेश होत असतो. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांनची दशा आणि दिशा यातून ग्रामीण विकासाचा अभ्यास करण्यात येणार असून जिल्हा परिशद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या कार्याचा ग्रामिण विकासात कितपत उपयोग करण्यात आलेला हे बघण्याचा मानस आहे. ग्रामिण विकास हाच भारतीय राजकिय व्यवस्थेचा खरा कणा आहे. आणि ग्रामिण विकासातूनच भारताची खरी प्रगती होतांना दिसुन येते हेच गांधीचीचे हि स्वप्न होते. जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे. अष्या ग्रामीण स्वराज्य संख्येच्या विकास व अडचणी या शोध निबंधातून प्रस्तुत करने हा उदेष.

Date of Online: 30 May 2022