Issue Description


Authors : डाॅ.राजेश पी. कांबळे

Page Nos : 185-187

Description :
भारताला कधी काळी सोन्याचा धूर निघणारा देश म्हटले जायचे. आजही भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. पूर्वी या देशात एक म्हण फार प्रचलित होती. ‘उत्तम शेती,मध्यम व्यापार,कनिष्‍ठ नोकरी’ आज मात्र उलट झाले आहे. आता म्हटले जाते ‘उत्तम नोकरी,मध्यम व्यापार,कनिष्‍ठ शेती! गेल्या अनेक वर्षापासुन शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरू आहेत. विदर्भात आणि त्याही पश्चिम विदर्भात त्या मोठया संख्येने होत आहेत. ही फार दुःखाची आणि शरमेची बाब आहे. शेतकरी आत्महत्या का करतात? या कारणाचा शेाध घेणे गरजेचे आहे. या समस्येवर उपाय म्हणुन शासनाने विदर्भासाठी पॅकेज जाहीर केले तरीही आत्महत्या सुरूच आहेत. याचा अर्थ, या पॅकेजच्या पलीकडे शेतक-याचे दुःख आहे. भारतीय अर्थव्यवस्था कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणुन गणली जाते. भारतातील एकुण लोकसंख्येपैकी 76 टक्के लोकसंख्या ही कृषी आणि कृषी आधारीत उद्योगातील अवलबुंन आहे, देशाच्या राष्‍ट्रीय उत्पन्नामध्ये केवळ एकटया कृषीक्षेत्राच्या आपले पारंपारिक स्वरूप सोडुन आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहे. जागतीकीकरण,खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या काळात राज्यानी बाजारीकरणाचे धोरण स्विीकारलेले आहे. त्यासाठी शेतकरीही प्रयत्नशील झाला आहे. शेती भारतीय अर्थव्यवस्थेचा ‘‘आत्मा’’ आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असावी या उददेशाने भारतात 1 जुलै 2017 पासून वस्तू व सेवा कर कायदा लागू करण्यात आला आणि परत शेतकर्‍यावर उपासमारीची वेळ या सरकारनी आणली. आजही जे हाल शेतकर्‍याना सोसावे लागत आहेत त्याचे परिणाम मात्र सपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेला भोगावे लागत आहे.

Date of Online: 30 May 2022