Authors : नितीन दा. गायकवाड, प्रा. डाॅ. सिद्धार्थ ज्ञा. नागदिवे
Page Nos : 161-163
Description :
भारतामध्ये पीक विमा योजना लागु करण्याची सुचना स्वातंत्र्यपूर्व काळात करण्यात आली. मात्र स्वातंत्र्यानंतर प्राप्तीनंतर लगेच पीक विम्याच्या कामास सुरुवात झाली. पीक विमाविषयी संसदेमध्ये सन 1947 ला चर्चा करण्यात आली. 1948 मध्ये भारत सरकारच्या कृशी मंत्रालयाद्वारे भारतातील पशु विमा व कृषी विमा स्थितीचा अभ्यास करण्यासाठी श्री. जी. एस. प्रियोलकर यांना नियुक्त करण्यात आले. त्यांनी आपला अहवाल 1949 मध्ये दिला. त्यांच्या अहवालानुसार पायलट पीक विमा योजना सर्व राज्यासाठी सुरु करण्यासाठी सुचना देण्यात आली. यानंतर सन 1965 मध्ये भारत सरकारने एक पीक विमा विधेयक संसदेत मांडले आणि एक माॅडल पीक विमा योजना सुरु केली. परंतु राज्यानी आर्थिक कारणामुळे त्या योजनेस नाकारले. सन 1972-73 पासून मर्यादित स्वरुपात पीक विमा योजना भारतीय जीवन विमा महामंडळाच्या सर्व साधारण विमा विभागाने भ्4 कापसाच्या जातीसाठी एक पीक विमा योजना सुरु केली. ही योजना सन 1978-79 पर्यंत देशात सुरु होती. खरीप 1979 पासून पायलट पीक विमा योजना प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली. पायलट पीक विमा योजना ही 1985 पर्यंत चालु होती. यानंतर 1985 पासून व्यापक पीक विमा योजना सुरु करण्यात आली. सदर संशेाधन पेपरमध्ये वर्धा जिल्ह्याातील शेती पीक विम्याच्या स्थितीचा अभ्यास करण्यात आलेला आहे.