Authors : निलेश दे. हलामी
Page Nos : 136-141
Description :
ई-बँकिंगने ग्राहकांच्या बँकिंग सवयींमध्ये आमूलाग्र बदल करून भारतातील पारंपारिक बँकिंग प्रणालीची जागा घेतली आहे. ई-बँकिंगला इंटरनेट बँकिंग किंवा ऑनलाइन बँकिंग म्हणूनही ओळखले जाते, याने बँकिंगचा परिचालन खर्च कमी करून वित्तीय सेवा क्षेत्रावर मोठा प्रभाव पाडला आहे.
कोविड-19 महामारीच्या संकटामुळे संपर्करहित पेमेंट आणि ऑनलाइन बँकिंग सेवांचा वापर लक्षणीय वाढला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मचा अनुभव घेण्यासाठी बँकिंग सेवांकडे ग्राहकांची धारणा काही प्रमाणात या महामारीमुळे बदलली आहे. क्राउड फंड इनसायडरच्या नवीन अहवालानुसार, दोन तृतीयांश किंवा 68 टक्के भारतीय ग्राहक सध्या व्यवहार करण्यासाठी डिजिटल किंवा मोबाइल बँकिंग प्लॅटफॉर्म वापरत आहेत. देशातील इंटरनेट वापरकत्र्यांची एकूण संख्या सप्टेंबर 2021 अखेर 638.25 दशलक्ष वरून डिसेंबर 2021 अखेर 661.42 दशलक्ष झाली आहे (TRAI नुसार). बँकेच्या ग्राहकांचा समाधानावर ई-बँकिंग सेवेच्या गुणवत्तेचा महामारीच्या प्रभावाचे परीक्षण करणे आणि इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगच्या वापरावर प्रभावीत करणारे मुख्य घटक ओळखणे हे या पेपरचे उद्दिष्ट आहे. नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग या विविध ई-बँकिंग सेवांबद्दल ग्राहकांची काय धारणा आहे आणि कशाला प्राधान्य देतात हे या पेपरमध्ये अभ्यास करण्यात आले आहे.