Issue Description


Authors : प्रा. अरविंद ढोके, प्रा. डॉ. प्रकाश तितरे

Page Nos : 132-135

Description :
आत्मनिर्भर भारत हा आता फक्त घोषवाक्य नसून राष्ट्रीय संकल्प आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे देशांतर्गत उद्योगाला चालना देण्यासाठी मानसिकता व धोरणात्मक चैकट बदलणे हे अत्यंत आवश्यक आहे. भारताला आत्मनिर्भर बनविण्याकरिता व आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याकरिता भारताचा ग्रामीण विकास, महिलाचे सक्षमीकरण, विविध शासकीय योजना चा परामर्श, भारतीय अर्थव्यवस्थेवर बवअपक-19 चे झालेले परिणाम असे अनेक विषयाच्या संदर्भात देशातील सामाजिक व आर्थिक नवकल्पना जाणून घेण्यास मदत मदत होईल व भारताला आत्मनिर्भर होण्याकरिता मदत करता येईल असे वाटते. आज या विषयाचे महत्त्व बवअपक-19 च्या महामारीच्या काळात अतिशय जास्त आहे कारण या महामारी मुळे देशासमोर अनेक प्रश्न किंवा समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या सोडविण्याकरिता भारत सरकार तसेच राज्य सरकार प्रयत्न करीत आहेत परंतु जी मनुष्यहानी झालेले आहे ती भरून निघणार नाही. त्यामुळे अत्यावश्यक सामाना करिता किंवा अन्नधान्य करिता आपण दुसर्या देशांवर अवलंबून राहणे उचित होणार नाही. या उद्देशाने 12 मे 2020 ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना देशासमोर मांडली. ती पूर्ण करण्याकरिता भारतीय अर्थव्यवस्थेत तेव्हापासून मोठी गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने व विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान चलित प्रणाली, दोलायमान लोकसंख्याशास्त्र आणि मागणी या पाच पिल्लर वर आत्मनिर्भरतेचे प्रयत्न अवलंबून असतील असे स्पष्ट करण्यात आले. हे सर्व लक्षात घेता संशोधकाने “आत्मनिर्भर भारत: संधी आणि आव्हाने” या विषयाची निवड केली आहे. या शोधनिबंधात आत्मनिर्भर भारताकरिता भारतात असलेल्या संधी जसे भारतीय संविधान व त्यातील तरतुदी, युवाशक्ती, नैसर्गिक संसाधने, सांस्कृतिक धरोहर, मानवी भांडवल, पर्यटन व्यवसाय, भारतीय बाजारपेठ इत्यादीबाबत चर्चा करण्यात आली आहे. तसेच आत्मनिर्भर भारत होण्याकरिता भारता समोर आव्हाने आहेत जसे भांडवल निर्मिती चा दर कमी, निम्न प्रतीचे मानवी भांडवल, तांत्रिक प्रगती व नवप्रवर्तन याची कमी, उद्योजकता व उपक्रमशीलता याची उदासीनता, राष्ट्रीय चारित्र्याचा अभाव, आर्थिक व सामाजिक विषमता.

Date of Online: 30 May 2022